भारतीय क्रिकेटर्स आणि त्यांचे यशस्वी बिझनेस…

क्रिकेट आपल्या देशात धर्म आणि Indian Cricketers देव मानले जातात. तासनतास उन्हात सराव कठीण सरावकरुन ते देशाचे प्रतिनिधीत्व करतात आणि संघ जिंकावा यासाठी मैदानावर सर्वोत्तम खेळ सादर करतात. या खेळासाठी त्यांना कोटींमध्ये पैसे मिळतात. सोबत काही ॲड्स किंवा ब्रॅन्ड ॲम्बेसेडर बनून ते आपला बॅंक बॅलेन्स हलता ठेवतात. तर काही Cricketers आलेले पैशांचे अनेक व्यवसायात गुंतवतात. तर पाहुयात देशातील स्टार क्रिकेटर्सचे कोणते बिझनेस आहेत.

विराट कोहली : गुंतवणूकीच्या बाबतीत भारताचा सध्याच्या कर्णधार आणि रनमशीन विराट कोहलीचा हात कोणीही धरू शकत नाही. त्याने ‘चिझेल’ या नावाने जीम व फिटनेस सेंटर तर ‘व्रॉग्न’ या नावाने कपड्यांचा ब्रॅन्ड सुरू केला आहे. यासोबत फुटबॉलमध्ये एफसी गोवा, रेस्टलिंगमध्ये बंगळुरू योद्धा आणि टेनिसमध्ये युएई रॉल्स या संघांचा कोओनर आहे. तसेच सर्वाधिक मिळकतीमध्ये विराट भारतात अव्वल तर जगभरात पहिल्या पाच खेळाडूंमध्ये गणला जातो.

सचिन तेंडुलकर : क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर मैदानातील सर्वोत्कृष्ट खेळामुळे सर्वश्रूत आहे. तसेच तो बिझनेसमध्येही तितकास माहीर आहे. त्याने आतापर्यंत हॉटेल्स आणि अन्य खेळात मोठ्या गुंतवणुकी केल्या आहेत. त्याचे ‘तेंडुलकर्स’ या नावाने हॉटेल आहे. तर ‘आयएसएल’मधील कोची टस्कर्स या संघाचा कोओनर आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमिअर लीगमधील मुंबई फ्रेंचायझी त्याच्या नावावर आहे.

एम एस धोनी : देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार आपल्या बिझनेसमध्येही यशस्वी आहे. त्याचे स्पोर्ट्स फीट नावाचे फिटनेस सेंटर भारतात आणि जगभरात आहे. त्याने सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पिअनशीपमध्ये आपल्या नावाने रेसिंग टीम सुरू केली. तर ‘आयएसएल’मध्ये चेन्नई तर हॉकी इंडिया लीगमध्ये रांची रेस या संघांचा कोओनर आहे. तो आयपीएलमधील एका फ्रेंचायझीमध्येही गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येते.

सौरव गांगुली : टीम इंडियाचा दुस-या क्रमाकांचा यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीच्या रक्तातच बिझनेस आहे. गांगुली कुटुंबाचे कोलकाया येथे पीढीजात बिझनेस आहेत. सचिनप्रमाणे त्याने ‘आयएसएल’मधील ॲटलेटिको डी कोलकाता या संघाचा कोओनर आहे. तसेच तो ‘दादागिरी अनलिमिटेड’ या रिॲलिटी शोचा होस्ट आहे.

Click Here for more information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?