Google Plus अकाउंट असे करा डिलीट

Google ने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या सोशल मीडिया सर्विसच्या सिक्युरिटीमध्ये गडबड झाली आहे. ज्यामुळे त्याच्या जवळपास ५ लाख युजर्सच्या वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याची बाब उघड झाली. कोणीतरी तिसऱ्या पार्टीच्या कंपनीने आमच्या युजर्सच्या माहितीचा वापर केलेला नाही. तसं पाहता सिक्युरिटीचा हा प्रश्न गुगलने मार्चमध्ये ओळखला होता पण कंपनीकडून यात कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती.

याबाबत विचारणा केली असता कंपनीने सांगितलं की, आम्ही आमची सोशल मीडिया सर्विस बंद करण्याची योजना तयार करत आहोत. कंपनीने पुढे हे ही स्पष्ट केलं की हे काम एवढ्या लवकर होणार नाही. या कामाला अधिक वेळ लागू शकतो. यासाठी जर आपल्या सुरक्षेबाबत चिंता करत असाल आणि आपले गुगल प्लस अकाऊंट डिलीट करण्याच्या विचारात असाल तर या गोष्टींचा अवलंब करा.

ही प्रोसेस सुरू करण्याआधी एका गोष्टीची खातरजमा करा की, तुमचे गुगल प्ल्स अकाऊंट आहे का नाही. जाणून घेऊयात या गोष्टींची खातरजमा कशी करावी.
हे करण्याआधी पहिल्यांदा तुमचे जीमेल अकाउंट लॉग इन करा.
यानंतर आपल्या प्रोफाइल पिक्चरवर जाऊन वरील उजव्या बाजूला कोपऱ्यात क्लिक करा
आता जर तुमचे जीमेल अकाऊंट तुमच्या गुगल प्लस अकाऊंटला लिंक केले असेल तर त्यावर ‘Google+ profile’ दिसेल.

यानंतर या स्टेप्स फॉलो करा

१. आपले जीमेल ओपन करा आणि आपला युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
२. यानंतर स्क्रीनवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात जाऊन क्लिक करा.
३. आता तुम्ही तुमच्या गुगल प्लस पेजवर रिडायरेक्ट करून जाल.
४. आता डावीकडे जाऊन सेटिंग्ज वर क्लिक करा.
५. यानंतर खाली स्क्रोल करून अकाऊंट सेक्शनमध्ये डिलीट युवर गुगल पल्स प्रोफाइलवर जा.
६. आता आपले अकाऊंट व्हेरीफाय करण्यासाठी आपला पासवर्ड एंटर करा.
७. पुढील पेजवर जाऊन स्क्रोन करत ‘Also unfollow me from anyone I am following in other Google products’ ऑप्शनवर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला अलर्ट देण्यात येईल की एकदा जर तुम्ही तुमचे अकाऊंट डिलीट केल्यानंतर हे पुन्हा रिस्टोर करता येणार नाही. याशिवाय जो डेटा एकदा डिलीट झाल्यानंतर तोही रिस्टोर करता येणार नाही.
८. यानंतर ‘Delete’ बटनावर क्लिक करा.
९. आता सर्वात शेवटी तुम्हाला कंफर्मेशन स्क्रीन आणि सर्वे दिसेल ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा.

 

Original Source: 
https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/know-how-delete-your-google-plus-account/articleshow/66260496.cms

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?